Teachers get relief in salary hike | Sarkarnama

हजारो शिक्षकांना दिलासा ; हमीपत्रावर  मिळणार वेतनवाढ

सरकारनामा
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

आमदार कपिल पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करत होते. ज्या शिक्षकांची 23 ऑक्‍टोबर 2017 च्या शासन निर्णयापूर्वी सेवेची 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशा शिक्षकांना हमीपत्र देऊन वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई   : मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतरांची सेवा 12 वर्ष झाल्यानंतरही वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण न झाल्याचे कारण देत लेखाधिकारी त्यांना वेतनवाढ नाकारत होते. शिक्षण विभागाकडून प्रशिक्षण मिळत नसल्याने शिक्षकांना वेतनश्रेणीच्या लाभापासून दूर रहावे लागत होते. मात्र, आता हमीपत्राच्या आधारावर वेतनवाढ देण्यात येणार असल्याने हजारो शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

शिक्षकांना 12 व 24 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी दिली जाते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी देण्यात येत नव्हती.

यामुळे शिक्षक भारतीने ज्या शिक्षकांची सेवा 12 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यांना भविष्यात प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या हमीपत्रावर वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याची मागणी केली होती. मात्र, लेखाधिकारी यांनी हमीपत्राच्या आधारावर वेतनश्रेणीचे लाभ देण्यास विरोध दर्शविला होता.

 आमदार कपिल पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करत होते. ज्या शिक्षकांची 23 ऑक्‍टोबर 2017 च्या शासन निर्णयापूर्वी सेवेची 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशा शिक्षकांना हमीपत्र देऊन वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्‍यकता नसल्याने वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यास लेखाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले
 

संबंधित लेख