teachers disappoint with tavade`s new policy | Sarkarnama

कमी पटाच्या बंद करण्याबाबत पुन्हा चर्चा : शिक्षक संघटना तावडेंवर पुन्हा नाराज

संतोष शेंडकर
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

सोमेश्वरनगर : कमी पटाच्या शाळां बंद करून त्यांचे एकत्रिकरण करण्याच्या निर्णयास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने विरोध केला आहे. याबाबत २५ सप्टेंबर रोजी शिक्षण विभागाच्या ऑनलाईन बैठकीत चर्चा होणार आहे. या निर्णयास विरोध करण्यासाठी शिक्षक समितीने काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यशासनाने राजस्थानच्या धर्तीवर कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. त्यादृष्टीने काही शाळा बंदही करण्यात आल्या. यामुळे दुर्गम, आदीवासी, डोंगरी भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाणार आहे.

याअनुषंगाने जानेवारी 2018 मध्ये राज्य शिक्षक समितीच्या ओरोस येथील अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांसोबत चर्चा केल्याशिवाय असा निर्णय होणार नाही असा शब्द दिला होता. तसेच कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनातही शाळा बंद केल्या जाणार नाहीत असा शब्द दिला होता. यानंतरही मंगळवारी 'कमी पटाच्या शाळांचे एकत्रिकरण करणे व विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता देणे' या विषयावर दुपारी तीन वाजता शालेय शिक्षण विभागाच्या मुख्य सचविांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील महत्वाच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची व्हिडीओ काँन्फरन्स होणार आहे. यामुळे शिक्षण विभागात पुन्हा खळबळ उडाली आहे.

याशिवाय अतिरीक्त शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करणे, विद्यार्थी माहिती अद्ययावत करणे, शालेय पोषण आहार योजनेत सुधारणा करणे, लोकसहभाग वाढविणे असे विषयही घेतले जाणार आहेत. या निर्णयास शिक्षक समितीने विरोध केला असून उद्या दिवसभर काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निषेध आंदोलनानंतरही शासनास जाग न आल्यास व्यापक आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर व राज्याचे माजी अध्यक्ष नाना जोशी यांनी दिली. 
 
संबंधित लेख