teachers condem buchke and karanjkhele | Sarkarnama

शिवसेना जिल्हा परिषद सदस्या बुचके आणि करंजखेले यांचा निषेध

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

मंचर : मोरडेवाडी (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जिल्हा शिक्षक पुरस्कार निवडीत अपात्र शिक्षकांना पुरस्कार दिल्याचा आरोप चुकीच्या माहितीवर करण्यात आला आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पुरस्कार मिळालेल्या शाळेची बदनामी केल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके व आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजखेले यांचा ग्रामस्थांनी काळ्या फिती लावून बुधवारी (ता.12) निषेध केला. आरोप करणाऱ्यांनी गावात येऊन माफी मागावी अन्यथा शुक्रवार (ता.14) पासून शाळा बेमुदत बंद ठेऊ, असा इशारा गावकऱ्यानी दिला.
 
पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोगस शिक्षक पुरस्काराची चौकशी करण्याची मागणी बुचके यांनी केली होती. शाळेची बदनामी झाल्याने व बुचके यांनी निराधार आरोप केल्याने गावकऱ्यांनी शाळेत बैठक घेतली. ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोरडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू मोरडे, बाबुशेठ मोरडे, कांताराम मोरडे, संदीप गोडसे, दिनेश मोरडे, नवनाथ मोरडे, विठ्ठल मोरडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच दत्त गांजाळे व ग्रामपंचायत सदस्य अरुण नाना बाणखेले येथे भेट देऊन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. गावकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. 

बाजीराव मोरडे म्हणाले, पुणे जिल्हा अध्यक्ष चषक, गुणवत्ता चषक, यशवंतराव कला क्रीडा स्पर्धेतील यश चमकदार कामगिरी, आतापर्यंत 58 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना विविध संस्थामार्फत पुरस्काराने सन्मान असा शाळेचा नावलौकिक आहे.

शिक्षक गणेश वामन व नंदकुमार चासकर यांनी पालक व ग्रामस्थांच्या मागणीनुसार जादा तास घेतले. त्याचे वेळापत्रक लेखी त्यांना दिले होते. दोघांच्याही परिश्रमामुळे 17 विद्यार्थी शिष्यवृत्तीत आले. गावकऱ्यांनी वामन यांना मोटारसायकल व चासकर यांना लॅपटॉप देऊन गौरव केला आहे. हि वस्तुस्थिती असताना आंबेगाव पंचायत समितीत करंजखेले व जिल्हा परिषदेत बुचके यांनी शाळेची बदनामी होईल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काळ्या फिती लाऊन त्यांचा निषेध केला आहे.
 
संबंधित लेख