teachers and graduate elections postponed | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर 

संजय मिस्किन
सोमवार, 14 मे 2018

मुंबई : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासह राज्यातील चार मतदारसंघात येत्या आठ जून रोजी होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. या निवडणुकीची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या संदर्भात आमदार कपिल पाटील व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन डावखरे यांनी निवडणूक पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाला तातडीने पत्र पाठविले होते.

विधान परिषदेच्या राज्यातील कोकण व मुंबई पदवीधर आणि नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी 8 जून रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, सुटीनिमित्ताने शिक्षक व पदवीधर मतदार गावी गेले असल्यामुळे आमदार कपिल पाटील व निरंजन डावखरे यांनी निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी तातडीने आयोगाला पत्र पाठविले होते.

शाळेला सुटी असल्यामुळे शिक्षक मतदार गावी गेले होते. तर उन्हाळ्याच्या सुटीमुळे पदवीधर मतदारही मूळ गावी वा पर्यटनासाठी गेले होते. येत्या 15 जून रोजी शाळा सुरू होणार असल्यामुळे नियोजन करुन सुटीवरुन परतण्यासाठी शिक्षक व पदवीधरांनी प्रवासाचे आरक्षण केले होते. ऐनवेळी आरक्षण बदलण्यास अडचणी येणार होत्या.

त्यामुळे या निवडणुकीच्या मतदानावर विपरित परिणाम होण्याची दाट शक्‍यता होती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आमदार कपिल पाटील व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन वसंत डावखरे यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच 12 जून रोजी तातडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले होते. निवृत्त होणाऱ्या सदस्यांची मुदत 7 जुलै रोजी संपत असून, गेल्या वेळी निवडणूक 2 जुलै रोजी झाली असल्याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले होते. तसेच निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

दोघा आमदारांच्या पत्राची दखल घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील चार मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या 15 ते 18 जून दरम्यान शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात 18 जूननंतर मतदान होण्याची शक्‍यता आहे. 
 
संबंधित लेख