tausif shaikh's agitaion in nagar | Sarkarnama

कर्जतच्या तौसिफ शेखने दाखवला 'पेटलेला कार्यकर्ता'!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

शेख एका चारचाकी वाहनात जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि तातडीने उतरुन स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून घेतले.  

नगर : कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थानच्या जमिनीवरील सर्व अनधिकृत बांधकामे तत्काळ काढण्याच्या मुद्दयावरुन आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या तौसिफ हासीम शेख यांनी आज (गुरूवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.  

याबाबत माहिती अशी, की जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कर्जत येथील मुस्लिम बांधवांसह शेख हे 28 जून व 30 जून 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनधिकृत बांधकाम हटविण्यासंदर्भात उपोषणास बसले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या चर्चेदरम्यान व संबंधित अधिकाऱ्यांनी सदरील जमिनीवरील सर्व कच्ची व पक्की बांधकामे 11 जुलै 2018 पर्यंत पाडून टाकू, असे आश्‍वासन दिले होते. कर्जत नगरपंचायतीने आपले कर्तव्य बजावण्यात कुचराई केल्याने शेख यांनी पुन्हा 20 ऑगस्ट 2018 रोजी पुन्हा उपोषण केले होते. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचे कळविले होते. परंतु, अहमदनगर महापालिका निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू असल्याने आत्मदहन करण्याचे स्थगित ठेवले होते. त्यानंतर गुरूवारी (ता. 20) सकाळी अकरा नंतर कधीही आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले होते. त्याप्रमाणे दुपारी 3.15 वाजता मात्र, शेख यांनी स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहन करण्यात आलेल्या आगीचा मोठा भडका उडाला होता. प्रसंगी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अंगावर चादर, शाल टाकून अखेर नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग विझविण्यात आली. मात्र, शेख गंभीररीत्या भाजले आहे. 

 

संबंधित लेख