Tatkare is not worth to take cognizance : Anant Gite | Sarkarnama

सुनील तटकरे दाखल घ्यायच्या लायकीचे नाहीत : अनंत गीते 

संपत मोरे 
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

...

पुणे :  "सुनील तटकरे काही बोलले असले तरी त्यांची मी कधीही दखल घेत नाही आणि तटकरे हे दखल घ्यायच्या लायकीचे नाहीत,"अशा शब्दात केंद्रीय मंत्री  अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर पलटवार   केला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री सुनील तटकरे यांनी "गीते यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य चांगले काम करतात.त्यानी एका स्टेजवर येऊन काय विकासकामे केलीत हे सांगावे"अस आव्हान दिलं होतं.

याबाबत गीते यांची प्रतिक्रिया  घेतली असता श्री .अनंत गीते म्हणाले,"तटकरे काहीही बोलले तरी त्याना मी उत्तर देत बसणार नाही कारण त्यांच्या विधानाची मी कधीही दखल घेत नाही. तेवढी त्यांची लायकी नाही."
-

संबंधित लेख