tariq anwar resings from ncp | Sarkarnama

अन्वर यांनी सोडली `घड्याळाची` साथ; पुन्हा हातात `हात` घेण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काॅंग्रेसला झटका बसला असून पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या तारीक अन्वर यांनी आज घड्याळाची साथ सोडली. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वपदाचा आणि लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. ते काॅंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पीटीआयच्या वृत्तनुसार राफेल डिलवर काय भूमिका घ्यावी, यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि तारीक अन्वर यांच्यात मतभेद झाले होते. पवार यांना एका मराठी चॅनेलला या विषयी दिलेल्या मुलाखतीत राफेल विमाने खरेदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेविषयी संशय घेण्याचे कारण नाही, असे मत व्यक्त केले होते. हे मत अन्वर यांना न पटल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे बोलण्यात येते.

पवार, अन्वर आणि पी. ए. संगमा यांनी सोनिया गांधी यांच्या परदेश जन्माच्या भूमिकेवरून काॅंग्रेसमध्ये वेगळे मत व्यक्त केले होते. त्यानंतर या तिघांचीही १९९९ मध्ये काॅंग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. त्यावेळी या तिघांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची स्थापना केली होती. पी. ए. संगमा हे देखील पक्षातून फुटून त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला होता. आता अन्वर यांनीही पक्ष सोडला आहे.

अन्वर यांची राहुल गांधी यांच्यासोबत या आधी चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. काॅंग्रेसने थेट राष्ट्रवादी या आपल्या मित्रपक्षाचाच मोठा नेता फोडण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे आगामी आघाडीवर काय परिणाम होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

संबंधित लेख