शिवसेनेची ‘खिंड’ लढवणारा ‘तानाजी’

राजकारणात प्रोफेशनल पणे कामाची पध्दत राबविताना थेट सामान्य नागरिकांच्या समस्येवर मोर्चे, आंदोलनं न करता थेट उपाययोजनांची अंमलबजावणी करणं हा तानाजी सावंत यांचा गुणधर्म आहे. आजही परांडा-भूम व वाशी तालुक्यात त्यांच्या स्वत:च्या खर्चाने मागेल त्या गावाला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
Tanaji-Sawant
Tanaji-Sawant

मुंबई :शिवसेनेत निष्ठावंत व जुन्या जाणत्या नेत्यांना सत्तेची संधी दिली जाते. पण याला अपवाद ठरलेत ते प्रा.तानाजीसावंत हे शिवसेनेतले नवे व्यक्तिमत्व..! 

राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषवाक्यानुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारणाला तानाजी सावंत यांनी सतत महत्व दिले. मुळ माढा ( सोलापूर ) च्या छोट्या गावात शेतकर्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. नापिक शेतीवरच कुटूंबाची गुजराण. अशाही स्थितीत त्यांनी अभियांत्रिकेचं शिक्षण घेतलं. पुण्यात भारती विद्यापिठात काही काळ नोकरी केली.

 नंतर वडिलांच्या नावानं ‘जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ’ ( जेएसपीएम) या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. राजकारणापासून दूर असणारे तानाजी सावंत यांनी स्वत:चे बंधूशिवाजी सावंत यांना माढा विधानसभेतून शिवसेनेची उमेदवारी मिळवली. पण त्यांचा पराभव झाला. 2013 मधे सावंत यांनी रितसर शिवसेनेत प्रवेश केला. 

दरम्यान परांडा व करमाळा या तालुक्यात त्यांना खासगी साखर कारखान्याची उभारणी करून साखरसम्राटांच्या बालेकिल्ल्यात स्वत:चा दबदबा तयार करण्यास सुरूवात केली. सामुहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून त्यांना दरवर्षी हजारो गोरगरीब कुटूंबाचे मोफत विवाह करून दिले. हाकार्यक्रम सध्याही सुरू आहे. 

त्यानंतर 2015 मधे त्यांनी परांडा तालुक्यातील मुगाव या गावचे रहिवास प्रमाणपत्र स्विकारत ते उस्मानाबाद जिल्ह्याचे नागरिक बनले. त्याच काळात उस्मानाबादचे भूम-परांडा-वाशी हे तीन्ही तालुके दुष्काळात होरपळत होते. त्यावर रामबाण उपाय म्हणून त्यांना संपुर्ण तालुक्यात ‘शिवजल क्रांती’चे कामसुरू केले. सुमारे अकरा नद्या पुर्नज्विवीत केल्या. नदी खोलीकरण व रूंदीकरण ही एक चळवळ मोठ्या प्रमाणात राबविली. सरकारचा एक रूपया न घेता सर्वस्वी निधी स्वत:च्या खिशातून करणारे प्रा.तानाजी सावंत यांच्या या शिवजल क्रांतीने शिवसेनेला नवी उभारी मिळाली.

 दोन महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या योजनेच्या लोकार्पण व जलपुजन साठी परांड्याचा दौरा केला. शिवसेनेत त्यांचे महत्व वाढले. त्याचीच बक्षिसी म्हणून त्यांना यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या निवडणूक मैदानात उध्दव ठाकरे यांनी उतरवले. मोठ्या मताधिक्याने त्यांनी निवडणूक जिंकली, अन सावंत घराण्यात पहिल्यांदा आमदारकी सुरू झाली. 

पक्षप्रमुखांशी सलोखा व समन्वय वाढत असतानाच पक्ष संघठनेसाठी तन-मन-धनाने त्यांनी झोकून दिले. शिवसेनेच्या उपनेते पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालत उध्दव ठाकरे यांनी त्यांच्याकडे उस्मानाबाद व सोलापूरच्या संपर्कप्रमुखाची जबाबदारी दिली.

या दोन्ही जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांसाठी हा धक्का होता. तरीही नेटानं त्यांनी गटबाजी मोडित काढत नव्या चेहर्यांना पक्ष संघटनेत संधी दिली. उस्मानाबाद मधे विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारून नवा युवा चेहरा असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळवली व प्रचंड गटबाजी असतानाही मोठ्या मताधिक्क्याने ही जागा जिंकून आणली. 

राजकारणात प्रोफेशनल पणे कामाची पध्दत राबविताना थेट सामान्य नागरिकांच्या समस्येवर मोर्चे, आंदोलनं न करता थेट उपाययोजनांची अंमलबजावणी करणं हा तानाजी सावंत यांचा गुणधर्म आहे. आजही परांडा-भूम व वाशी तालुक्यात त्यांच्या स्वत:च्या खर्चाने मागेल त्या गावाला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सरकार व सत्तेच्या पलिकडे जावून सामान्यांच्या समस्या स्वत:च्या खर्चातून सोडवणारा हा शिवसैनिक  म्हणजे शिवसेनेची खिंड लढवणारा ‘तानाजी’ अशी अल्पावधीत ओळख त्यांनी निर्माण केली आहे. 

एका शेतकरी कुटूंबातला सामान्य पोरगा ते शिक्षण व उद्योगातलं यशस्वी व्यक्तिमत्व अन आता थेट राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदावर झेप हा प्रा. तानाजी सावंत यांचा प्रवास राजकारणातल्या नव्या आयामांची सुरूवात असल्याचे मानले जात आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com