tanaji sawant and farmer | Sarkarnama

तानाजी सावंत स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाला म्हणाले, " तुम्हाला दोन- पाच लाख रूपये पाहिजे असेल तर देतो '

तानाजी जाधवर
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

उस्मानाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेचे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात फोनवरून झालेला संवाद सध्या चांगलाच गाजतोय. हे प्रकरण ताजे असतांनाच तानाजी सावंत यांनी स्वाभिमानीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांना फोनवरून " तुम्हाला, पक्षाला काही मदत लागली तर सांगा, तुम्हाला दोन- पाच लाख रूपये पाहिजे असेल तर देता े', अशी ऑफर फोनवरून दिली. या संभाषणाची ऑडिओ क्‍लीप सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 

उस्मानाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेचे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात फोनवरून झालेला संवाद सध्या चांगलाच गाजतोय. हे प्रकरण ताजे असतांनाच तानाजी सावंत यांनी स्वाभिमानीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांना फोनवरून " तुम्हाला, पक्षाला काही मदत लागली तर सांगा, तुम्हाला दोन- पाच लाख रूपये पाहिजे असेल तर देता े', अशी ऑफर फोनवरून दिली. या संभाषणाची ऑडिओ क्‍लीप सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 

भैरवनाथ साखर काऱखान्यावर गेल्या वर्षीची एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत होते. त्या दरम्यान रविंद्र इंगळे यांना आमदार सावंत यानी फोन करुन ही ऑफर दिल्याची माहिती इंगळे यांनी सरकारनामाशी बोलतांना दिली. यावेळी सांवत आणि इंगळे यांच्यामध्ये दीड मिनिट संभाषण झाले. यावेळी इंगळे यांना उद्देशून तानाजी सावंत म्हणाले, इंगळे नमस्कार, काय भाषणे वगैरे जोरात चालू आहे आमच्या इकडे, काय राव तुमचे आमचे संबध आहेत, नका असे करू तुम्ही, पक्षाला, तुम्हाला लागली तर मदत घ्या आमची. अडचण असेल तर सांगा आम्हाला, बोलता येईल काय असेल ते. राजू शेट्टीचे आमचे संबध खूप चांगले आहेत. उध्दव साहेबांना मी त्यांना बोलायला लावणार आहे, तसा विषय नाही. तुम्ही आमच्यावर टिका केली. आम्हाला आनंद वाटला, राजकारणात हा विषय असतो, त्याचे आम्हाला वाईट वाटणार नाही. 

देवाला लोक नाव ठेवतात, आम्ही तर माणूस आहोत. आम्हाला थोडफार सहकार्य करा तुम्ही. आम्ही पण तुम्हाला काय पाहिजे, जिथे म्हणाल तिथे मदत करू. उस्मानाबाद जिल्ह्यात तुमचं नाव आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच काम करा, आम्हालाही काय मदत करता येईल ती करा. शेतकऱ्यांसाठीची तुमची तळमळ बघून, तुम्हाला मदत करावीशी वाटते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष छोटा माणूस नाही. तुम्ही आपले आहात, समाजाचे आहात, तुमचा मला अभिमान वाटतो. तुम्ही मला काही सांगा, तुम्ही फक्त बोट ठेवा आणि सांगा की मला हे घ्यावेस वाटतयं मी त्याचे नियोजन करतो. हे तुमच्या आणि माझ्यातच ठेवा शेट्टींना सांगू नका. मी तुम्हाला म्हटलं ना दोन-पाच लाख रुपये पाहिजे असेल ना तर देतो मी, एक सहकार्य म्हणून.'' 

दीड मिनिटांची ही ऑडिओ क्‍लीप सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या अगोदर स्वाभिमानीचे नेते राजु शेट्टी यानी फोनवरुन श्री. सावंत याना चांगलेच धारेवर धरल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर ही दुसऱ्या ऑडिओ क्‍लीप बाहेर आली आहे. तानाजी सावंत यांच्या साखर कारखान्याचा परवाना निलंबित करण्याच्या प्रकरणा आधीची ही घटना असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष इंगळे यानी सांगितले. कारखान्याच्या एफआरपीवरुन श्री. सावंत अगोदरच अडचणीत आले असताना ही क्‍लिप आता वायरल होत असल्याने राजकीय दृष्ट्याही त्याना याचा फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त होऊ लागली आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर जिल्ह्यामध्ये श्री. सावंत यांच्याबद्दल तीव्र प्रतिक्रीया उमटल्याचे दिसून येत आहे. या क्‍लिपमधुन त्यानी श्री. शेट्टी यांच्याबद्दल बोलताना उध्दव ठाकरे यांना सांगणार असल्याचेही म्हटले आहे. शिवाय तुम्ही आमच्या समाजाचे असल्याने आम्हाला सहकार्य करण्याची विनंती इंगळे यांना केल्याचे दिसुन येते. 

संबंधित लेख