आजचा वाढदिवस : तानाजी सावंत, आमदार, शिवसेना. 

आजचा वाढदिवस : तानाजी सावंत, आमदार, शिवसेना. 

आमदार तानाजी सावंत हे शिवसेनेचे उपनेते आहे. शिक्षण, सामाजिक क्षेत्राकडून ते राजकारणाकडे वळले. त्यांनी इतर कोणत्या पक्षात प्रवेश करण्यापेक्षा त्यांना शिवसेना जवळची वाटली. शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते 2016 मध्ये यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. ते व्यवस्थापन शास्त्राचे पदवीधारक असून प्रारंभी भारती विद्यापीठात त्यांनी प्राध्यापकी केली. त्यानंतर जेएसपीएम शैक्षणिक संस्था सुरू केली. शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना ते सहकार आणि पुढे राजकारण क्षेत्राकडे वळले. या दोन्ही क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमठविला आहे. 

2016 मध्ये "शिवजल क्रांती' योजनेतून जलसंवर्धन कामात त्यांनी चमकदार कामगिरी केली. सामुदायिक विवाह सोहळाही ते दरवर्षी राबवितात. शिवसेनेचे सोलापूर, उस्मानाबाद
जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com