tajmahal built by terreriost bjp mla som | Sarkarnama

ताजमहाल देशद्रोह्यांनी बांधला : सोम

वृत्तसंस्था
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

मीरत : भाजपचे आमदार संगीत सोम यांनी आज ताजमहालच्या इतिहासातील स्थानाबद्दल शंका उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे. बाबर, अकबर आणि औरंगजेब हे "देशद्रोही' असून त्यांची नावे इतिहासातून काढून टाकावीत, अशी अजब मागणीही त्यांनी केली आहे. 

मीरत : भाजपचे आमदार संगीत सोम यांनी आज ताजमहालच्या इतिहासातील स्थानाबद्दल शंका उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे. बाबर, अकबर आणि औरंगजेब हे "देशद्रोही' असून त्यांची नावे इतिहासातून काढून टाकावीत, अशी अजब मागणीही त्यांनी केली आहे. 

संगीत सोम हे मीरत जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथील सिसोली गावात आठव्या शतकातील राजा अनंगपालसिंग तोमर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी झालेल्या सभेत बोलताना सोम यांनी इतिहासाचीही थोडी मोडतोड केली. ते म्हणाले,""हा कसला इतिहास आहे? या इतिहासात ताजमहाल बांधलेल्या सम्राटाने आपल्या वडिलांना तुरुंगात डांबले. त्याने उत्तर प्रदेश आणि हिंदुस्तानमधील हिंदूंवर अत्याचार केले. भारतावरील आक्रमकांचे इतिहासात फारच उदात्तीकरण झाले आहे.'' वास्तविक, ताजमहाल बांधलेल्या शाहजहानलाच त्याचा मुलगा औरंगजेबाने अखेरपर्यंत तुरुंगात डांबल्याचा इतिहास आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकारच्या पर्यटनस्थळांच्या यादीतून ताजमहालचे नाव काढून टाकल्याचे वृत्त असून त्या पार्श्‍वभूमीवर संगीत सोम यांचे आजचे विधान होते. ताजमहालचे नाव यादीतून काढून टाकल्यामुळे अनेकांना दु:ख झाल्याचेही सोम म्हणाले. 

प्रताप आणि छत्रपती शिवाजी यांच्यासारख्या खरोखरीच्या युगपुरुषांचे चरित्र आणि त्यांचे कार्य शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकविण्याची गरज असल्याचे सोम म्हणाले. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन पुस्तिकेतून ताजमहालचे नाव गायब झाल्यानंतर टीका झाल्यावर सरकारने पत्रक प्रसिद्ध करत सारवासारव केली आहे. 

संबंधित लेख