swabhimani agitation at sidhheshwar suger factory | Sarkarnama

अखेर तुपकरांची भाषा काडादींना समजली! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

उसाच्या थकित एफआरपीसाठी सोलापूरात "स्वाभिमानी' आक्रमक झाली. प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी तोडफोडीची भाषा केल्यानंतर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागणी मान्य करण्याची भूमिका घेतली. 

सोलापूर : उसाच्या थकित एफआरपीसाठी सोलापूरात "स्वाभिमानी' आक्रमक झाली. प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी तोडफोडीची भाषा केल्यानंतर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागणी मान्य करण्याची भूमिका घेतली. 

एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करून घंटानाद केला. रविकांत तुपकरांनी कारखान्याचे ऑफिस फोडण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रशासन हादरले. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी तेथे पोहोचले. आठ दिवसांत एफआरपीची रक्कम देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. 

या आंदोलनात "स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल (सोलापूर विभाग), जिल्हाध्यक्ष समाधान फाटे (पंढरपूर विभाग), सिद्धरामअप्पा अब्दुलपूरकर, उमाशंकर पाटील, विजय रणदिवे, रणजित बागल, बिळ्यानी सुलटे, नरेंद्र पाटील, रजाक मकानदार, नवनाथ माने, सचिन म्हस्के यांच्यासह दाधिकारी उपस्थित होते. 

संबंधित लेख