suvendra gandhi moves in high court | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

उमेदवारी वाचविण्यासाठी सुवेंद्र, दिप्ती गांधी उच्च न्यायालयात

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

नगर : महापालिका निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या भाजपच्या चार व राष्ट्रवादीच्या एका उमेदवारांनी औरंगाबादच्या उच्च न्यायालयात अपिल दाखल केले. आज न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेवून हरकतीदारांना सोमवारपर्यंत बाजू मांडण्याची संधी दिली.  

काल छाननीत उमेदवारी अर्ज बाद झालेल्या उमेदवारांनी  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र व स्नूषा दिप्ती गांधी यांच्यासह भाजपचे चार व राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराने आज उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात आज उमेदवारांची बाजू ऐकून घेतली. आता हरकतदारांना बाजू मांडण्याची संधी दिली आहे. त्यामुळे यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
 

संबंधित लेख