विधानसभेत विरोधी 9 आमदारांचे निलंबन मागे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांची घोषणा

'23 मार्च ते 31 डिसेंबर 2017 पर्यंत 19 आमदारांचे निलंबन करण्यात यावे, असा प्रस्ताव 23 मार्च रोजी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी दत्ता भरणे, संग्राम थोपटे यांच्यासह इतर मिळून 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.अन्य 10 आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यात आले आहे.- गिरीश बापट
विधानसभेत विरोधी 9 आमदारांचे निलंबन मागे  संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांची घोषणा

मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव 23 मार्चला मंजूर केला होता. यापैकी 9 आमदारांचे निलबंन मागे घेत असल्याची घोषणा आज संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली.

यावेळी बापट म्हणाले, ''23 मार्च ते 31 डिसेंबर 2017 पर्यंत 19 आमदारांचे निलंबन करण्यात यावे, असा प्रस्ताव 23 मार्च रोजी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी दत्ता भरणे, संग्राम थोपटे यांच्यासह इतर मिळून 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.अन्य 10 आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यात आले आहे.''

निलंबीत आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार भास्कर जाधव, यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. विरोधी पक्षांनी याला तीव्र आक्षेप घेत सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार टाकला होता.

आताही विरोधकांचा बहिष्कार सुरूच असून विरोधकांची कर्जमाफीसाठी राज्यभरात संघर्ष सुरू आहे.

 खालील सदस्यांचे निलंबन मागे

 1)दत्ता भरणे –  इंदापूर, पुणे

2)संग्राम थोपटे – भोर, पुणे

3)दीपक चव्हाण – फलटण – सातारा

4)डी.पी. सावंत – नांदेड उत्तर

5) अब्दुल सत्तार - औरंगाबाद

6)अमित झनक – रिसोड

 7)नरहरी जिरवाळ – दिंडोरी, नाशिक

8) वैभव पिचड- अकोले,अहमदनगर

 9)अवधूत तटकरे – श्रीवर्धन


खालील आमदारांना निलंबित कायम आहे
काँग्रेसचे आमदार

अमर काळे – आर्वी मतदारसंघ, वर्धा
विजय वडेट्टीवार - ब्रम्हपुरी मतदारसंघ
हर्षवर्धन सकपाळ – बुलढाणा
कुणाल पाटील – धुळे ग्रामीण
राहुल जगताप – चिखली, बुलढाणा
जयकुमार गोरे - माण,सातारा


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार

भास्कर जाधव, गुहागर
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा- कळवा, ठाणे
मधुसूदन केंद्रे – गंगाखेड
संग्राम जगताप – अहमदनगर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com