आजचा वाढदिवस : सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री 

कार्यक्षम, प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी झाला. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सहभागी होत त्यांनी आणिबाणीला तीव्र विरोध केला आणि त्या राजकारणात सक्रिय झाल्या.
आजचा वाढदिवस : सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री 

कार्यक्षम, प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी झाला. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सहभागी होत त्यांनी आणिबाणीला तीव्र विरोध केला आणि त्या राजकारणात सक्रिय झाल्या. 

1996 आणि 1998 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर 2009 मध्ये मध्यप्रेदशातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या. त्या 2000 ते 2009 या कालावधीत त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्या माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कामकाजमंत्री ही मंत्रिपदे त्यांनी सांभाळली होती. 1998 मध्ये त्या अल्पकाळासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्या 2009 ते 2014 मध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या. 2014 मध्ये त्या मध्यप्रदेशातील विदिशा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्या परराष्ट्रमंत्री आहेत. 

संसदेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असतात. "उत्कृष्ट संसदपटू' म्हणून त्यांना 2008, 2010 मध्ये गौरविण्यात आले होते. 2004 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना "सर्वोत्तम खासदार' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोदी सरकारमध्ये परराष्टमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपली ओळख "कणखर' अशी करून दिली आहे. अडचणीत सापडलेल्यांना अगदी परदेशी नागरिकांसाठी त्या तातडीने मदत करतात. आपल्या कार्यकाळात चित्रपट निर्मितीस त्यांनी उद्योगाचा दर्जा मिळवून दिला. सरकारने नेमलेल्या विविध समित्यांवर त्यांची वेळोवेळी नेमणूक झाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com