sushilkumar shinde congress | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 जुलै 2017

सोलापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी आज नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. 

सोलापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी आज नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. 

शिंदे यांच्यासारख्या अत्यंत वरिष्ठ अशा नेत्याकडे हिमाचल प्रदेशसारख्या राज्याची जबाबदारी देणे हे काहीसे अनपेक्षित मानले जात असले, तरी सध्या कॉंग्रेसची सर्व राज्यांमध्ये होत असलेली घसरण आणि पीछेहाट लक्षात घेता कॉंग्रेसला हिमाचलसारख्या लहानशा राज्यातही सत्ता टिकवून धरण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे. हिमाचलमध्ये सध्या कॉंग्रेसचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेले आहेत. भाजपने हे राज्य कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार केला आहे. अशा स्थितीत या राज्यात कॉंग्रेसची सत्ता टिकविण्याचे आव्हान शिंदे यांना पेलावे लागणार आहे. 

शिंदे यांनी यापूर्वीही सरचिटणीस म्हणून काम पाहिलेले आहे. याआधी त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, ईशान्येकडील सर्व राज्ये अशा महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. गांधी कुटुंबीयांचे एक विश्‍वासू नेते म्हणून ते ओळखले जातात. सध्या राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या योजनेनुसार एकेका राज्यासाठी एकच प्रभारी नेमण्यात येत आहे. अंबिका सोनी यांनी प्रकृतीच्या कारणास्त्व सरचिटणीसपदाचा काल राजीनामा दिला. त्यांच्याकडे हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्‍मीर अशी तीन राज्ये होती; पण आता त्यांच्याकडे केवळ जम्मू-काश्‍मीरचीच जबाबदारी ठेवण्यात आली आहे. शिंदे यांच्याबरोबर सचिव म्हणून खासदार श्रीमती रंजीत रंजन यांना नेमण्यात आले आहे व त्यांच्याकडेही हिमाचलचीच जबाबदारी असेल. 

विश्‍वास सार्थ करेन 
पक्ष सांगेल ती जबाबदारी मी नेहमीच पार पाडीत आलो आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी माझ्यावर जो विश्‍वास दाखविला आहे तो निश्‍चितच सार्थ करून दाखवेन याची खात्री आहे. 
- सुशीलकुमार शिंदे, सरचिटणीस 

 

संबंधित लेख