सुशीलकुमार शिंदे यांचे चव्हाणांसह आर. आर. पाटलांकडेही बोट?

सुशीलकुमार शिंदे यांचे चव्हाणांसह आर. आर. पाटलांकडेही बोट?

पुणे : सनातन’वर बंदी घालण्याच्या मागणीसाठी तत्कालीन राज्य सरकारने प्रस्ताव पाठविला होता, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आता कितीही सांगत असले तरी या प्रस्तावाचा पाठपुरावा राज्य सरकारने तेव्हा का केला नाही, असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. एकूणच सनातनवर बंदी घालण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री चव्हाण आणि  गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्याकडे तर शिंदे बोट दाखवत नाहीत ना, असा सवाल उपस्थित झाला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडल्यानंतर आता पुन्हा सनातनवर बंदी घालण्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यात चव्हाणे हे सध्या आक्रमकपणे मुद्दा मांडत आहे. तेव्हाचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे सनातनवर बंदी घालण्यासाठी फार आग्रही नव्हते, अशी चर्चा काही ज्येष्ठ पत्रकारांनी लिखाणातून मांडली आहे. सुशीलकुमार यांनी थेट कोणाचे नाव घेतले नसले तरी याबाबत पुन्हा नव्याने वेगवेगळी मते मांडली जाऊ लागली आहेत.

सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवला तेव्हा मी केंद्रात गृहमंत्री नव्हतो, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव त्याआधी म्हणजे साधारणत: २००८ मध्ये पाठविला. मी २०१२ मध्ये केंद्रात गृहमंत्री झालो. मात्र, तरीही त्या वेळी आपल्याकडे संबंधितांनी पाठपुरावा केला असता तर हा बंदीचा निर्णय कदाचित मार्गी लागला असता. हा प्रस्ताव ज्या तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठविण्यात आला त्यांचे नाव उघड करावे, म्हणजे वस्तुस्थिती समोर येईल, असे शिंदे म्हणाले. या प्रश्नावर यापूर्वीही एक-दोन वेळा असेच आरोप झाले होते, त्या वेळीही आपण खुलासा केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

मी गृहमंत्री पदावर येण्यापूर्वीच म्हणजे २००८ ते १२ या काळातच याबाबत योग्य प्रकारे पाठपुरावा होणे गरजेचे होते. मी गृहमंत्री झाल्यानंतरही त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात मला साधा दूरध्वनी केला असता तरी त्यात लक्ष घालता आले असते आणि पुढील कारवाई सहज करता आली असती, असाही दावा शिंदे यांनी केला. मात्र राज्याच्या गृहखात्याचा फाॅलोअप त्यासाठी कमी पडला का, अशी शंका आता व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com