Sushil kumar shinde is congress general secretary | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे  हिमाचल प्रदेशची जबाबदारी 

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 22 जुलै 2017

नवी दिल्ली   : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी आज नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. 

नवी दिल्ली   : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी आज नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. 

शिंदे यांच्यासारख्या अत्यंत वरिष्ठ अशा नेत्याकडे हिमाचल प्रदेशसारख्या राज्याची जबाबदारी देणे हे काहीसे अनपेक्षित मानले जात असले, तरी सध्या कॉंग्रेसची सर्व राज्यांमध्ये होत असलेली घसरण आणि पीछेहाट लक्षात घेता कॉंग्रेसला हिमाचलसारख्या लहानशा राज्यातही सत्ता टिकवून धरण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे. हिमाचलमध्ये सध्या कॉंग्रेसचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेले आहेत. भाजपने हे राज्य कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार केला आहे. अशा स्थितीत या राज्यात कॉंग्रेसची सत्ता टिकविण्याचे आव्हान शिंदे यांना पेलावे लागणार आहे. 

शिंदे यांनी यापूर्वीही सरचिटणीस म्हणून काम पाहिलेले आहे. याआधी त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, ईशान्येकडील सर्व राज्ये अशा महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. गांधी कुटुंबीयांचे एक विश्‍वासू नेते म्हणून ते ओळखले जातात. सध्या राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या योजनेनुसार एकेका राज्यासाठी एकच प्रभारी नेमण्यात येत आहे. अंबिका सोनी यांनी प्रकृतीच्या कारणास्त्व सरचिटणीसपदाचा काल राजीनामा दिला. त्यांच्याकडे हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्‍मीर अशी तीन राज्ये होती; पण आता त्यांच्याकडे केवळ जम्मू-काश्‍मीरचीच जबाबदारी ठेवण्यात आली आहे. शिंदे यांच्याबरोबर सचिव म्हणून खासदार श्रीमती रंजीत रंजन यांना नेमण्यात आले आहे व त्यांच्याकडेही हिमाचलचीच जबाबदारी असेल. 
 

संबंधित लेख