sushama swaraj america tour | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

सुषमा स्वराज यांचा अमेरिका दौरा भरगच्च

वृत्तसंस्था
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रसंघाच्या 73 व्या महासभेसाठी येथे आलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे येथील वेळापत्रक अत्यंत व्यग्र आहे. महासभेबरोबरच त्या विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्याबरोबर स्वतंत्रपणे चर्चा करणार असून सार्क आणि ब्रिक्‍स गटाच्या होणाऱ्या बैठकींमध्येही त्या सहभाग घेणार आहेत. 

सुषमा स्वराज शनिवारीच येथे आल्या असून आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंमलीपदार्थांविरोधातील कारवाईबाबत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या. याच कार्यक्रमाने राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमांना सुरवात होणार आहे. 

अंमली पदार्थांविरोधात सर्व देशांनी एकत्र येत कारवाई करण्याचे आवाहन राष्ट्रसंघातर्फे केले जाणार आहे. स्वराज यांचा हा दौरा एका आठवड्याचा असून या काळात त्या 30 द्विपक्षीय चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले. इतर विविध बैठकांबरोबरच स्वराज येथील भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. 

संबंधित लेख