suryawanshi brothers rejoin bjp | Sarkarnama

सूर्यवंशी बंधूंचा जयंत पाटलांचा चकवा; पुन्हा भाजपसोबत! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 जुलै 2018

सांगली : सांगली आणि कुपवाडच्या काही प्रभागात प्रभावशाली ठरणारे सूर्यवंशी बंधूंना पुन्हा भाजपच्या गोटात परतले आहेत. विद्यमान नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांनी आमची भाजपबरोबरच चर्चा असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गटनेते किरण सूर्यवंशी यांनी भाजपच्या गोटात प्रवेश केला आहे. आज दुपारी ते तातडीने "हॉटेल आयकॉन इन' मध्ये थांबून राहिलेल्या भाजप नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ते गेले. 

कॉंग्रेस नेते प्रतिक पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील यांनी आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ थांबवत हॉटेल सोडले. त्यामुळे आघाडीच्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. भाजपचे गुऱ्हाळ मात्र सुरुच आहे. 

मोठ्या घडामोडीत नेते जयंत पाटील यांनी सूर्यवंशी बंधूना वश करण्यात यश मिळवले होते. सकाळी साडेआठनंतर सूर्यवंशीचे फोन स्विच ऑफ झाले होते. त्यामुळे भाजप गोटात खळबळ माजली. दुपारी साडेबारानंतर धीरज सूर्यवंशी हॉटेलमध्ये दिसू लागले. पत्रकारांनी विचारणा केली असता आम्ही भाजपसोबतच अजून चर्चा करीत आहोत असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या खुलाशामुळे ते पुन्हा भाजपच्या तंबूत दाखल झाल्याचे दिसून येत आहे. 

संबंधित लेख