Survay to decide fare structure of Rikshaw and Taxi's | Sarkarnama

रिक्षा व टॅक्सीच्या भाडे सुधारणेसाठी शासनाकडून सर्वेक्षण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ अचानक होते आणि मग मध्यमवर्गीयांची चिडचिड होते. रिक्षा आणि टॅक्सीची भाडी किती असावीत याबाबत लोकांना काय वाटते हे  या आधी कधी जाणून घेतले गेले नव्हते. पण आता राज्याच्या परिवहन विभागाने लोकांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात टॅक्सी व रिक्षांच्या भाडयामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक समिती नेमली आहे.  रिक्षा, टॅक्सी या प्रवाशांचे चालक, त्यांच्या संघटना आणि प्रवाशांचे दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी समितीने दिलेल्या आदेशानुसार एका सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

https://goo.gl/YtJnmc

वर दिलेल्या लिंक वर महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहन विभागाच्या वेबसाईटवरील चार फाॅर्म पर्यंत पोहोचता येईल. जास्तीत नागरिकांनी हे फाॅर्म भरून सर्वेक्षण पूर्ण करायला हातभार लावावा, असे आवाहन परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले आहे.

 

संबंधित लेख