sureshdada jain birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुरेशदादा जैन (माजी आमदार शिवसेना) 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

सुरेशदादा ऊर्फ सुरेश भिकमचंद जैन जळगाव विधानसभा क्षेत्रातून तब्बल नऊ वेळा निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पक्ष बदल सतत केला आहे, मात्र जनतेने त्यांना निवडून दिले आहे. सन 1980 मध्ये त्यांनी प्रथम भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवून विजयी झाले. त्यानंतर 1985 समाजवादी कॉंग्रेस, 1990 समाजवादी (शरदचंद्र सिन्हा कॉंग्रेस), 1995 भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, 1999 शिवसेना, 2004 राष्ट्रवादी कॉंग्रेस, सन 2009 शिवसेना, तर 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेतर्फेच निवडणूक लढविली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

सुरेशदादा ऊर्फ सुरेश भिकमचंद जैन जळगाव विधानसभा क्षेत्रातून तब्बल नऊ वेळा निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पक्ष बदल सतत केला आहे, मात्र जनतेने त्यांना निवडून दिले आहे. सन 1980 मध्ये त्यांनी प्रथम भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवून विजयी झाले. त्यानंतर 1985 समाजवादी कॉंग्रेस, 1990 समाजवादी (शरदचंद्र सिन्हा कॉंग्रेस), 1995 भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, 1999 शिवसेना, 2004 राष्ट्रवादी कॉंग्रेस, सन 2009 शिवसेना, तर 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेतर्फेच निवडणूक लढविली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. जळगाव शहर पालिकेवर त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 35 वर्षे सत्ता होती. युती व आघाडी शासनाच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. राजकारणासोबतही सामाजिक क्षेत्रातही त्यांची कार्य आहे. 
 

संबंधित लेख