suresh patil starts magarashtra kranti sena | Sarkarnama

मराठा शब्द वगळून सुरेश पाटलांनी केली महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना

सिद्धेश्वर डुकरे
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

मुंबई : विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनातील कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी "महाराष्ट्र क्रांती' या नव्या पक्षाची पाडव्याच्या मुहूर्तावर स्थापना केली आहे.
 

मुंबई : विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनातील कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी "महाराष्ट्र क्रांती' या नव्या पक्षाची पाडव्याच्या मुहूर्तावर स्थापना केली आहे.
 
आपल्या विविध मागण्यासाठी मराठा समाजाने "एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत लाखोच्या संख्येने शांततेत मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले होते. मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा दोन महिन्यापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाने काहींचा विरोध डावलत अखेर आज महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाशी घेतली फारकत घेऊन पाटील यांनी पक्षाची स्थापना केली आहे. मात्र मराठा मोर्चाने अशा प्रकारे मराठा समाजाचा वापर करून पक्ष न काढण्याचा इशारा दिला होता.मराठा नावाचा वापर पक्षाच्या नावात नको असेही सांगण्यात आले होते. तरीही पाटील यांनी न जुमानता पक्षाची घोषणा केली आहे.

लोकसभेच्या पाच आणि विधानसभेच्या ५० जागा लढवणार आसल्याचे पाटील यांनी जाहीर केले आहे. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली १३ संघटना यांचा नव्या राजकीय पक्षाला पाठिंबा असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
 

संबंधित लेख