रॉकेलचा दिवा, गळकी झोपडी ते मंत्रीपद; सुरेश खाडेंचा कष्टाचा आणि निष्ठेचा प्रवास 

तासगाव तालुक्यातील पेडसारख्या आडवळणी गावात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सुरेश खाडे यांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत झालेला प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
suresh-khade
suresh-khade

पुणे-"सुरेशभाऊ यांनी खूप हालाखीत दिवस काढले आहेत.ते लहान असताना झोपडीत रहात. आई आणि त्यांचे दोन  भाऊ रहात.पावसाळ्याच्या दिवसात झोपडीच छप्पर गळायच. एका ठिकाणी गळायला लागलं,तिथं भांड ठेवलं जायचं. तिथ भांड ठेवलं की दुसऱ्या ठिकाणी गळायला सुरु व्हायचं. रात्रभर फक्त गळणाऱ्या ठिकाणी भांडी ठेवायला लागायची.झोप व्हायची नाही. एकवेळ अशी यायची घरातली भांडी संपायची पण गळणं थांबायचं नाही...सगळी भुई ओली व्हायची,"असं खाडे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलेली गोष्ट.

तासगाव तालुक्यातील पेडसारख्या आडवळणी गावात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सुरेश खाडे यांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत झालेला प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. भाजपने सुरेश खाडे यांना मंत्रिपद देऊन त्यांच्या पक्षनिष्ठेचा सन्मान केला आहे . 

तासगाव तालुक्यातील पेड गावात शेतमजुरी करणारे खाडे यांचे आईवडील. पोरांनी खूप शिकावं,मोठं व्हावं अशी आईची खूप इच्छा. पोरांच्या शिक्षणासाठी आईने खूप कष्ट केले. एका साध्या झोपडीत राहून खाडे आणि  त्यांच्या भावांनी राकेलच्या दिव्यावर अभ्यास केला. त्याकाळात कंदील असणं ही मोठी गोष्ट होती पण या भावांना कंदीलसुद्धा मिळाला नाही. एवढी गरिबी. पण सुरेश खाडे आणि त्यांचे भाऊ दत्तात्रय ,शिवाजी यांना त्यांच्यासाठी आई जे कष्ट करायची त्यातून अभ्यासाची प्रेरणा मिळाली. गरिबीवर आपण मात करू शकतो असा विश्वास त्याना आला.

शिक्षणानंतर या बंधूनी व्यवसायात पदार्पण केले. प्रामाणिकपणा आणि सचोटीने व्यवसाय केला. आर्थिक प्रगती झाली तरी राहणीमान साधे ठेवले. दरम्यानच्या काळात सुरेश खाडे यांनी राजकारणात प्रवेश केला. जत विधानसभा मतदारसंघात एका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण या पराभवाने ते खचले नाही. त्यांचे बालपण असे अनेक नकार पाचवण्यात गेलं होतं त्यामुळे हा पराभव त्यानी संधी म्हणून पाहिला. नंतर तयारी केली. जतमधून 2004 साली आणि मिरज मधून 2009, 2014 असे तीनवेळा ते भाजपकडून विजयी झाले.

2014 साली भाजपचे सरकार आल्यावर त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल असे वाटत होते मात्र त्यांना हुलकावणी मिळाली.  पण आज मात्र पेड गावात एका झोपडीत राहिलेल्या आणि रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करणाऱ्या सामान्य कुटुंबातील माणसाला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांच्या शपथविधीला त्यांच्या आई उपस्थित होत्या.त्या माध्यमांशी बोलताना भावनिक झाल्या होत्या. त्यांनी केलेल्या कष्टाचं आज चीज झालं आहे.

खाडे मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी ते मूळचे तासगाव तालुक्यातील पेड गावचे आहे.आर आर आर आबा पाटील यांच्यानंतर तासगाव तालुक्याला दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com