suresh jain shivsena jalgaon | Sarkarnama

लोकांचा कौल स्वीकारतो, पराभवाची कारणे शोधू - सुरेशदादा जैन

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जळगाव : जळगाव महापालिकेत गेल्या चाळीस वर्षांचे सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. त्यांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला अवघा 11 जागा मिळाल्या आहेत. या पराभवाबद्दल विचारले असता सुरेशदादा जैन यांनी सांगितले की आम्ही लोकांसमोर आमची मते मांडली पण लोकांनी आम्हाला स्वीकारले नाही, जनतेचा कौल आम्ही स्वीकारत आहोत, पक्षाच्या पराभवाच्या कारणांचा आम्ही शोध घेऊ. 

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला सहकार्य केले नाही काय असे विचारले असता ते म्हणाले असे आपणास वाटत नाही, पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे. जैन यांच्या या नम्र प्रतिक्रीयेबद्दल इथल्या राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जैन यांची जळगाव महापालिकेवरची 40 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख