भाजप प्रदेशाध्यक्षपदी हळवणकरांचे नाव आघाडीवर!

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणरक यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सुत्रांकडून समजते. येत्या 21 जुलै रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे.भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणरक यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सुत्रांकडून समजते. येत्या 21 जुलै रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी हळवणकरांचे नाव आघाडीवर!

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणरक यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सुत्रांकडून समजते. येत्या 21 जुलै रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

विदयमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. त्यामुळे या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असली तरीही इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. भाजपमध्ये अनेक नावांचा यासाठी विचार सुरू आहे. यामध्ये मराठवाडयातील विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आदींचा यामध्ये समावेश आहे. असे असले तरीही हळवणकर यांना श्रेष्ठींनी शब्द दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान भाजपची प्रदेश कार्यकारिणी येत्या 21 जुलै रोजी होणार असल्याचे समजते. यामध्ये आगामी निवडणुकीची तयारी हा मुख्य विष्षय राहणार आहे.

मुंबई अध्यक्षांचाही शोध होणार
मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून मंत्री आशिष शेलार यांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी सलग दोनवेळा या पदाला योग्य न्याय दिला आहे. तिस-या खेपेस त्यांना संधी मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून तरतूद करावी लागणार आहे. तरीही या पदासाठी खासदार मनोज कोटक,आमदार अतुल भातखळकर, आमदार पराग आळवणी आदींची नावे चर्चेत आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com