बुध्दीभेद करण्यात बंटी पाटलांना गोल्ड मेडल द्यावे लागेल! 

बुध्दीभेद करण्यात बंटी पाटलांना गोल्ड मेडल द्यावे लागेल! 

कोल्हापूर : दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. याची जनतेला माहिती द्या. नाहीतर हा निधी आपणच दिल्याचे सांगून बुध्दीभेद केला जाईल. बुध्दीभेद करण्यात गोल्ड मेडल द्यायचे झाले तर ते बंटी पाटलांनाच द्यावे लागेल, अशी टीका भाजपचे सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली. 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांच्या बूथ मेळाव्याचे आयोजन आमदार अमल महाडिक यांनी लोणार वसाहतीतील एका कार्यालयात केले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या या मेळाव्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. 

कोल्हापूर दक्षिण मतदार संघात पायाभूत सुविधांसाठी शासनाने प्रचंड मोठा निधी दिला आहे. त्यातून अनेक विकासकामे झाली आहेत. या विकासकामांची माहिती सर्व मतदारापर्यंत पोहोचवण्याचा सल्ला आमदार हाळवणकर यांनी आमदार महाडिक यांनी दिला. तुम्ही निधी आणि विकासकामांची माहिती जनतेला दिली नाहीतर जिल्ह्यातील टग्या नेता, ही माहिती आपल्याच नावाने खपवले. बुध्दीभेद करण्यात बंटी पाटील यांना गोल्ड मेडलच द्यावे लागेल, असा टोलाही आमदार हाळवणकर यांनी लावला. त्यांच्या या वक्‍तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com