निलगिरीप्रमाणे वाढलेल्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागा : सुरेश धस

 निलगिरीप्रमाणे वाढलेल्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागा : सुरेश धस

बीड : माझ्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी केवळ पैसेवाले म्हणून रमेश कराड यांना उमेदवारी दिली. मात्र, मुंडावळ्या बांधलेली नवरी मांडवातून पळून गेली अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती झाली असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी लगावला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल रविवारी त्यांचा पाटोदा येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सत्कारापूर्वी त्यांची गावातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली. 

राष्ट्रवादीमधील काही मंडळींचे नेतृत्व हे निलगिरीच्या झाडासारखे (या झाडाचा सावलीसाठी फायदा नसतो उलट ते जमिनीतून पाणी अधिक शोषतात) वाढले आहे. तर वडाच्या झाडाप्रमाणे पक्ष वाढविणाऱ्यांना तेथे बाजूला सारले जाते. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना आपणच पक्षात आणले होते असेही धस म्हणाले. 

सुरेश धस म्हणाले, राज्यात जिल्हा परिषदेत विरोधी मतदानाच्या दोन घटना घडल्या. मात्र, केवळ आपल्यावर कारवाई करुन पक्षात वेगवेगळा न्याय असतो यावर शिक्कामोर्तब केले. मला हरविण्याच्या इर्षेपोटी काही नेत्यांनी परभणीची राष्ट्रवादीची हक्काची जागाही घालविली. 

राष्ट्रवादीत नाती - गोती पाहून पदे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजाभाऊ देशमुख, सयद अब्दुल्ला, मधुकर गर्जे, संजय नवले, प्रकाश कवठेकर, माऊली जरांगे, बबन सोनबणे, श्री. नारायणकर, सोमीनाथ कोल्हे, सयद शहानवाज, नयुम पठाण, श्रीहरी गिते, संदीप जाधव, जब्बार पठाण, पांडुरंग नागरगोजे, संजय सानप, आसेफ सौदागर, बालाजी जाधव, राजु जाधव, बळीराम पोटे, नरेंद्र जावळे उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com