सुरेश देशमुखांवरची नाराजी उफाळली तरच वेगळा निकाल

 सुरेश देशमुखांवरची नाराजी उफाळली तरच वेगळा निकाल

परभणी : परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सोमवारी (ता.21) मतदान होत आहे. आघाडीचे सुरेश देशमुख की युतीचे विप्लव बाजोरिया कोण बाजी मारणार याचा फैसला सोमवारी मतदानयंत्रात बंद होणार आहे. संख्याबळाचा विचार करता आघाडीचे सुरेश देशमुख यांचे पारडे जड दिसते. परंतु सुरेशरावांवरची मतदारांची नाराजी उफाळून येण्याचीही दाट शक्‍यता राजकीय वर्तूळात व्यक्त केली जात आहे. 

परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकीत कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुरेश देशमुख व शिवसेना - भाजप युतीचे विप्लव बाजोरिया यांच्यात सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद, नगरपालिका, परभणी महापालिका सदस्य व पंचायत समितीचे सभापती यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क असतो. 

परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात आघाडीचे संख्याबळ जास्त आहे. यात राष्ट्रवादी कॉग्रेस - 162 कॉग्रेस - 135, भारतीय जनता पक्ष 51, शिवसेना 97, राष्ट्रीय समाज पक्ष 07, जनशक्ती विकास आघाडी 15, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 05, एम.आय.एम 01, घनदाट मामा मित्रमंडळ 07, अपक्ष 22 असे आहे. आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांना कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी झाल्याने या दोन्ही पक्षासह जनशक्ती विकास आघाडी, घनदाट मित्र मंडळ, एमआयएम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य मतदान करू शकतात. 

शिवसेनेकडे भाजपसह राष्ट्रीय समाज पक्षाचे सदस्य मतदान करू शकतात. असे झाले तर सुरेश देशमुखांचे पारडे जड होण्याची शक्‍यता आहे. परंतू सुरेश देशमुख यांच्यावर त्यांच्याच पक्षातील काही सदस्यांची नाराजी दिसून येते. त्यामुळे याचा फटका त्यांना बसण्याची ही दाट शक्‍यता आहे. 
चर्चेमुळे वातावरणवरण गरम 
गेल्या महिनाभरापासून दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या गाठी - भेटी घेतल्या आहेत. दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. रविवारी दिवसभर दोन्ही पक्षाकडून निरनिराळ्या बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यातून वेगवेगळ्या चर्चा पसरत होत्या. यामुळे रविवारचा दिवस पूर्ण गरमागरमीचाच होता. परंतू सोमवारी मतदानाच्या वेळी खऱ्या अर्थाने परिस्थिती समोर येणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com