surekha kadam defeats dipti gandhi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

सुरेखा कदमांनी केला खासदारस्नुषा दिप्ती गांधींचा पराभव

मुरलीधर कराळे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

नागरिकांनी त्यांना त्यांच्या कामाची पावती दिली.

नगर: भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या स्नुषा दिप्ती गांधी यांचा पराभव करून शिवसेनेच्या महापौर राहिलेल्या सुरेखा कदम यांनी विजयश्री खेचून आणली. नागरिकांनी त्यांना त्यांच्या कामाची पावती दिली आहे.  

प्रभाग १२ मधून सर्वसाधारण महिला जागेसाठी शिवसेनेकडून कदम यांनी उमेदवारी केली होती. त्यांच्या विरोधात खासदार दिलीप गांधी यांच्या स्नुषा दीप्ती गांधी यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता. या प्रभागात त्यांना राष्ट्रवादीचे रिझवान चुडीवाले हेही प्रमुख प्रतिस्पर्धी होत्या. परंतु खरी लढत गांधी विरुद्ध कदम म्हणजेच भाजप विरोधात शिवसेना अशीच होती.

भाजपने केलेला गाजावाजा, मुख्यमंत्र्यांची सभा, खासदारांचे वजन वापरून झालेला प्रचार अशा वातावरण निर्मितीमुळे प्रभागात भाजपमय वातावरण तयार झाले. मात्र शिवसेनेने पुन्हा निर्भय नगर या मुद्द्यावर केलेला घरोघरी प्रचार तसेच कदम यांनी केलेले कामे यामुळे जनमताचा कौल त्यांना मिळाला.

टॅग्स

संबंधित लेख