suraj mandhare appointed as nashik collector | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

पुणे झेडपीचे CEO सूरज मांढरे आता नाशिकचे जिल्हाधिकारी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 12 मार्च 2019

राज्य सरकारने  आज तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. 

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन याची मेरिटाइम बोर्डाच्या संचालकपदी बदली झाली आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमारडीए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम कुमार यांची नेमणूक झाली आहे. 

पीएमआरडीचे किरण गित्ते यांचा महाराष्ट्रातील प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने हे पद रिक्त झाले होते. मांढरे यांच्या जागी अद्याप इतर अधिकाऱ्याची निुयुक्ती झालेली नाही. 

मांढरे यांच्या कार्यकालात पुणे जिल्हा परिषदेने सेवा हमी कायद्यात राज्यात सर्वोत्त कामगिरी केली होती. तसेच त्यांनी प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला होता. शिक्षण आणि आरोग्य विभागाकडे त्यांनी अधिक लक्ष दिले होते. पुणे जिल्ह्यातील शहीद जवानांची कुटुंबांना आणि मुलांना शासकीय अधिकाऱ्यांमार्फत मदत करण्याचा उपक्रम त्यांनी नुकताच राबविला होता. या उपक्रमात 117 कुटुंबांना मदत करणयासाठी अधिकारी पुढे आले. या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची काळजी हे अधिकारी वैयक्तिरित्या घेणार आहेत.  तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ या कुटुंबांना वेळेवर मिळेल यासाठी दक्षता घेणार आहेत. 
 

संबंधित लेख