Supriya Sule upset over law & order situation in Maharashtra | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही ? सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षींय दोन मुलींवर बलात्कार झाला, त्या पैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रीया सुळे यांनी व्यक्त केली आहे. 

बारामती शहर :  राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे, या राज्यात कायद्याचा झाक उरलाय की नाही, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. 

पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षींय दोन मुलींवर बलात्कार झाला, त्या पैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रीया सुळे यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णतः निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे. 

रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही हे सिध्द करणारी असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले आहे. गेले काही दिवस राज्यातील महिलांवर सातत्याने होणा-या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गंभीर टीका केली आहे. 

संबंधित लेख