संसदरत्न हा बारामतीसह  महाराष्ट्रातील जनतेचा गौरव :सुप्रिया सुळे

संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल खासदार सुळे, श्रीरंग बारणे,धनजंय महाडीक,हिना गावीत, राजीव सातव आणि रजनी पाटील या महाराष्ट्रातील सहाजणांसह देशातील बारा खासदारांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे व राहील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संसदरत्न हा बारामतीसह  महाराष्ट्रातील जनतेचा गौरव :सुप्रिया सुळे

पिंपरी : संसदरत्न पुरस्कार हा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे. त्यामुळे  हा पुरस्कार मी जनतेलाच समर्पित करीत आहे, या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी हा उत्क्रूष्ट संसदपटूचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल खासदार सुळे, श्रीरंग बारणे,धनजंय महाडीक,हिना गावीत, राजीव सातव आणि रजनी पाटील या महाराष्ट्रातील सहाजणांसह देशातील बारा खासदारांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे व राहील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

संसदेमधील उपस्थिती,चर्चासत्रांमधील सहभाग, उपस्थित प्रश्न आणि पटलावर मांडलेली खासगी विधेयके या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी हा पुरस्कार 
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि प्रिसेन्स इ- मॅगॅझीनतर्फे दिला जातो. तामीळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांच्या हस्ते चेन्नई येथील राजभवनमध्ये शनिवारी त्याचे वितरण झााले. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फाऊंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून तो सुरु करण्यात आला आहे.

गेल्याच आठवड्यात सुळे यांनी लोकसभेत 'राईट टू डिस्कनेक्ट' हे खासगी विधेयक मांडले. यावेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सुप्रिया सुळे यांच्या संसदेतील कामकाजाचे कौतुक केले.या पुरस्कारासाठी  सुळे यांची पुन्हा निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com