supriya sule questions devendra fadavnis | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

महाराष्ट्राचा 'लाडका' मुख्यमंत्री एकही शब्द कां काढत नाही?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे : सुप्रिया सुळे

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्‍या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

सुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत? हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रामध्येही सातत्याने मुलींची होणारी छेडछाड, बलात्कार अशा गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होवून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या क्राईम रिपोर्टमध्ये अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. याचं उत्तर कोण देणार, असा सवालही त्यांनी केला आहे. 

संबंधित लेख