SUPRIYA SULE INTERACTS WITH STUDENTS | Sarkarnama

मी तुला बारामतीचे तिकिट देईल...पण दोन निवडणुका माझा प्रचार कर : सुप्रिया सुळे

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

पुणे - खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात पिरंगुट येथील प्रज्ञा  नावाच्या एका मुलीने "मला खासदार व्हायचं आहे," अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्किलपणे "तू अजून लहान आहेस.  दोन वेळा माझा प्रचार कर. मी तुला दहा वर्षांनी तिकीट दयायला सांगते, पण आपल्या दोघीतले हे सिक्रेट कोणालाही सांगू नकोस,"असं म्हणताच एकच हास्यकल्लोळ झाला. 

पुणे - खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात पिरंगुट येथील प्रज्ञा  नावाच्या एका मुलीने "मला खासदार व्हायचं आहे," अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्किलपणे "तू अजून लहान आहेस.  दोन वेळा माझा प्रचार कर. मी तुला दहा वर्षांनी तिकीट दयायला सांगते, पण आपल्या दोघीतले हे सिक्रेट कोणालाही सांगू नकोस,"असं म्हणताच एकच हास्यकल्लोळ झाला. 

टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थींनी आणि आशा वर्कर्स यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी सुळे यांनी जमलेल्या मुलींना बोलते केले. त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यातून हा गमतीशीर प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या वेळी उपस्थित होते.

सुळे यांनी मुलींना करियरविषयक काही प्रश्न विचारले. पोलिस कोण होणार ?डॉक्टर कोण होणार ?वकील कोण होणार ?कलेक्टर कोण होणार, असे ते प्रश्न होते. पोलिस होणार असल्याच्या संख्येचा आवाज मोठा होता. तुम्ही पोलिस झाल्यानंतर चुकून माझ्याकडून वाहतुकीचा नियम पाळला गेला नाही तर मला सोडणार ना, त्यालाही हो..., असे जोरात उत्तर मिळाले. 

खासदार होण्याची कोणाला इच्छा आहे का, असा प्रश्न विचारल्यावर थोडी शांतता पसरली. पण पिरंगुटमधील प्रज्ञा नावाची मुलगी उभा राहिली. ती म्हणाली, `मला खासदार व्हायचे आहे`

तेव्हा सुळे यांनी तिला तिचे वय विचारले. तिने तेरा असे सांगताच अजून बारा वर्षे तुला थांबावे लागेल. तुझे नाव साहेबांच्याकडे दे आणि तू अजून दोन वेळा माझा प्रचार कर. दहा वर्षांनी मी निवडणूक लढवणार नाही. तूच खासदार हो, असेही त्यांनी गमतीत सांगितले. पण तू माझा प्रचार केला नाहीस तर तिकीट मिळणार नाही, असे सांगताच हशा उसळला.

बारामती मतदारसंघातील तब्बल 25 हजार विद्यार्थिनींना आतापर्यंत सायकल देण्यात आल्या आहेत. अपंगांना उपकरणांची योजना देशात सर्वात प्रभावीपणे राबविल्याचे सुळे यांनी या वेळी सांगितले. शरद पवार यांनी आतापर्यंत फक्त मुलींना सायकली देण्यात आल्या आहेत. पुढील वर्षापासून मुलांनाही सायकली देण्याची सूचना केली.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख