supriya sule enjoys Nagpachami festival | Sarkarnama

सुप्रिया सुळे यांनी फुगडी खेळताच सराटीतील महिलांनी केला जल्लोष! 

डॉ. संदेश शहा 
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सराटी (ता. इंदापूर) येथे स्वातंत्र्यदिन आणि नागपंचमी निमित्त आयोजित "महाराष्ट्राची लोकधारा' कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेक पारंपारिक खेळांत सहभाग घेवून आनंद लुटला . 

इंदापूर (पुणे) : सराटी (ता. इंदापूर) येथे स्वातंत्र्यदिन आणि नागपंचमी निमित्त आयोजित "महाराष्ट्राची लोकधारा' कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेक पारंपारिक खेळांत सहभाग घेवून आनंद लुटला . 

सुरवातीस सुप्रिया सुळे वैशाली नागवडे यांच्यासमवेत फुगड्या खेळल्या. झिम्मा फुगड्या खेळल्यानंतर त्यांनी झोक्‍याचा आनंद लुटला. नागपंचमीच्या गाण्यांचा आनंद घेत फेर धरला. जिबल्या खेळल्यावर त्यांनी जात्यावर दळण देखील दळले. सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात भाग घेतल्याने उपस्थित विद्यार्थिनी, महिलांनी एकच जल्लोष केला. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, तालुकाध्यक्षा रेहाना मुलाणी, जिल्हा बॅंकेच्या संचालिका वर्षा शिवले, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सविता व्होरा आदी मैदानात उतरल्या होत्या. 

सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांच्या पुढाकाराने विद्यालयाच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमाचा लाभ हजारो महिलांनी घेतला. सर्व कार्यक्रम विद्यार्थी, पालक व कुटुंबियाना पहाण्यासाठी विशेष स्टेडीयम उभारण्यात आल्याने हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. या कार्यक्रमास जोडूनच विविध पाळणे, खाद्ययात्रा भरविण्यात आली होती. 

या कार्यक्रमाचे उदघाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, मंगलसिध्दी दुध संघाचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र तांबिले, जिल्हापरिषद सदस्य अभिजित तांबिले, पंचायत समिती सदस्य प्रदिप जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

फोटो फीचर

संबंधित लेख