supriya sule about karjat jamkhed assembly | Sarkarnama

अजित पवार कर्जत-जामखेडमधून लढणार नाहीत : सुप्रिया सुळे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती सोडून कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे कर्जत जामखेडचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 

श्रीगोंदा (नगर) :"कर्जत-जामखेडला अजित पवार यांच्याबाबत जी चर्चा आहे. तशीच अनेक ठिकाणीही असलीतरी तसे काही होणार नाही', असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

श्रीगोंद्यात त्या युवा संवाद यात्रेनिमित्त आल्या होत्या. या वेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. ती तशीच राहणार, हे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसने त्याबाबत आमच्याशी थेट चर्चाही केलेली नाही. त्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे, ते शरद पवार व सोनिया गांधी घेतील.

संबंधित लेख