supe sawargaopn new power centre | Sarkarnama

सुपे सावरगाव : नव्या राजकीय शक्‍तीकेंद्राचा उदय होणार ! 

मुरलीधर कराळे 
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

नगर : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवानबाबांच्या जन्मगावी होणार आहे. त्यामुळे सुपे सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) हे गाव आता राज्याच्या नकाशावर झळकणार आहे. या मेळाव्यासाठी गावकऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बीडबरोबरच नगर जिल्ह्यातील कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. 

नगर-बीड रस्त्याने गहिनीनाथ गडाजवळून सावरगावला जाता येते. गावाची लोकसंख्या सुमारे साडेपाच हजार आहे. भगवानबाबांचा ज्या वाड्यात जन्म झाला, तो वाडा सध्या पडक्‍या स्थितीत आहे. गावकऱ्यांनी बाबांचे सुंदर मंदिर बांधलेले आहे. 

मेळाव्यासाठी मंदिराजवळच सुमारे वीस एकर जागेवर नियोजन करण्यात आले आहे. भव्य व्यासपीठ उभारणीचे काम वेगात सुरू आहे. तसेच परिसरात सपाटीकरण करण्यात येत आहे. गरजेनुसार उद्याही सपाटीकरण करण्यात येईल. भाविकांना पिण्याचे पाणी तसेच इतर सुविधा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. 

आमच्या गावाचे भाग्य : विजय सानप 
सुपे सावरगाव येथे भगवानबाबांचा जन्म झाला. त्यामुळे ही भूमी पावन झाली. आता दसरा मेळावा गावात होत आहे. त्यामुळे हे गावचे भाग्य आहे. मेळाव्याची सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे हा मेळावा यशस्वी होईल, असे सावरगावचे सामाजिक कार्यकर्ते विजय सानप यांनी सांगितले. 

संबंधित लेख