गितेंनी विजयाचा जल्लोषही केली...पण अखेरीस माळ तटकरेंच्या गळ्यात

गितेंनी विजयाचा जल्लोषही केली...पण अखेरीस माळ तटकरेंच्या गळ्यात

अलिबाग : कोणत्याही लाटेला थारा न देणार्‍या लोकसभेच्या रायगड मतदार संघातील अनपेक्षीत निकालाची परंपरा यावेळेसही कायम राहिली. कधी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आधाडी तर कधी युतीचे उमेदवार अनंत गीते यांचे वर्चस्व यामुळे प्रत्येक फेरीत या निकालाची चुसर वाढतच जात होती. अखेर शेवटच्या फेरीपर्यंत सुनील तटकरे यांनी 21 हजारचे मताधिक्य राखण्यात यश मिळवत मागील निसटत्या पराभवाची परतफेड केली.

पंधराव्या फेरीनंतर 2 हजार 745 मतांची गीतेंकडे असणारी आघाडी सुनील तटकरे यांनी मोडीत काढत सतराव्या फेरीत सुनील तटकरेंनी घेतलेली 5 हजार 261 मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम राखण्यात सुनील तटकरेंनी कायम राखली.

श्रीवर्धन मतदार संघात सुनील तटकरेंना अनपेक्षित अशी 37 हजार मतांची आघाडी मिळाली यामुळे आपला विजय सोपा झाल्याचा दावा सुनील तटकरेंनी केला आहे. पहिल्या फेरीपासून या लढत चुरशीची होणार हे दिसून आले. प्रमुख उमेदवार राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, शिवसेनेचे अनंत गीते पहिल्या फेरीपासून मतमोजणी कक्षात उपस्थित होते. मतमोजणी कक्षात उमेदवारांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी यांनाच प्रवेश असल्याने आतमध्ये काय चालले आहे, याची कमालीची उत्स्कुता प्रेसरुममध्ये होती.

अधिकृत पहिल्या फेरीचा निकाला जाहीर झाला तेव्हा मतमोजणी कक्षात चौथ्या फेरीची मोजणी सुरू होती. यामुळे प्रसारमाध्यमावरुन प्रसारीत होणार्‍या बातम्यांमुळेची नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. इतक्यात आठव्या फेरीनंतर अनंत गिते यांना 4 हजार 449 चे मताधिक्य मिळताच त्यांनी बाहेर येत कार्यकर्त्यांसह आपलाच विजय असल्याचा दावा केला. यावेळेस ते मिडियाला देखील सामोरे गेले होते, यामुळे प्रसारीत झालेल्या बातम्यामुळे अनंत गीते यांचा विजय झाल्याचा गैरसमज पसरला होता. मात्र, त्यानंतर सुनील तटकरेंची आघाडी कायम राहिल्याने तटकरेंचा विजय निश्‍चित झाल्याने कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जल्लोष साजरा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com