सुनील तटकरे आणि मधुकर ठाकूर यांचे अखेर मनोमिलन

ष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि कॉंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे मनोमिलन झाले आहे.
Tatkare-Thakur
Tatkare-Thakur

नवी मुंबई : रायगड लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि कॉंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे मनोमिलन झाले आहे. तटकरे यांच्याबद्दलचा राग क्षमवून राहूल गांधींना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मधुकर ठाकूर हे सुनील तटकरेंच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती मधुकर ठाकूर यांनी माहिती दिली आहे

मागील लोकसभा निवडणुकीत  सुनील तटकरे यांना शेतकरी कामगार पक्षाचा तीव्र विरोध होता. अशा वेळी मधुकर ठाकूर यांनी अलिबाग मतदार  संघात सुनील तटकरे यांची बाजू लावून धरल्याने  सुनील तटकरे यांना  अलिबाग मध्ये आघाडी  मिळाली होती. या मदतीची परतफेड विधानसभा निवडणूकीत करीन असा शब्द तटकरे यांनी ठाकूरांना दिला होता. मात्र लोकसभेनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आघाडी तुटली. त्यामुळे तटकरेंनी ठाकूर यांना दिलेला शब्द पाळला नाही. यामुळे विधानसभा निवडणूकीत मधुकर ठाकूर यांचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे खचलेल्या ठाकूर यांनी तटकरेंविरोधात आवाज टाकला. 

मधल्या काळात सुनील तटकरेंना विरोध हे मधुकर ठाकूर यांचे एकमेव सूत्र राहिले. राज्यात काँग्रेस शेकाप राष्ट्रवादी आघाडीची घोषणा होऊनही मधुकर ठाकूर यांनी अलिबाग मध्ये  आपली ताकद शिवसेना , भाजपच्या मागे उभी केली. मधुकर ठाकूर यांचा हा पवित्र लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अंगलट येऊ शकतो हे चाणाक्ष तटकरेंनी जाणले. आणि त्यातूनच त्यांनी  मधुकर ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर आज मधुकर ठाकूर यांनी आपली आणि अलिबाग मधील कॉंग्रेसची भूमिका जाहीर केली. 

यावेळी त्यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार असून राहुल गांधी यांन देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आमचा पाठींबा राहील आणि आम्ही त्याप्रमाणे प्रचारात देखील सहभागी होणार असल्याचे मधुकर ठाकूर यांनी जाहीर केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com