sunil tatkare and vinod tawade news assembly | Sarkarnama

शिवरायांशी बेईमानी करणाऱ्यांना कधीच यश मिळणार नाही - सुनील तटकरे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या उंचीच्या विषय जोरदार गाजला. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय कोणत्या स्तरावर घेण्यात आला याचा खुलासा करावा अशी मागणी करीत राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलात आणि आता त्यांच्याशीच बेईमानी करत असाल तर तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही असे भावनिक उद्गारही तटकरे यांनी यावेळी काढले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांच्या उंचीचा विषय ठरला असतानाही त्यांची उंची कमी करण्याचा निर्णय कोणत्या स्तरावर घेण्यात आला. आणि आम्हाला छत्रपती शिवराय हे नेपोलियन पेक्षाही अधिक उंचीचे आहेत. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याच्या उंचीबाबत नुसते निवेदन न करता सरकारने यामागील भूमिका जाहीर करावी अन्यथा कामकाज होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

दरम्यान, परिषदेत उपस्थित असलेले शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यावरही जोरदार टीका केली. सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करत असताना त्यांना ते कसे दिसले नाही, असा खोचक सवाल तटकरेंनी केला.

त्यावर चिडलेल्या तावडेंनी या स्मारकासाठी परवानग्या घेता आल्या नाहीत म्हणून ते असे गैरसमज करत असल्याची टीका तावडे यांनी केली. त्यावर प्रत्त्युत्तर म्हणून तटकरे यांनी मागच्या सरकारचे ढोल किती दिवस वाजवून आपले अपयश झाकता, असा सवाल करत तावडे यांना कोंडीत पकडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उंचीचा विषय हा अचानकपणे आणला असल्याने त्यावर चर्चा करून लवकर निवेदन मांडू असे आश्वासन तावडे यांनी दिले.  

संबंधित लेख