Sunil Tatkare and Ajit Pawaron Marathwada tour | Sarkarnama

पक्षबांधणीसाठी सुनील तटकरे व अजित पवार उद्यापासून आठ दिवस मराठवाड्याच्या  दौऱ्यावर

  सरकारनांमा ब्यूरो 
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई     पक्ष बांधणीवर भर  देण्यासाठी येत्या 10 जूनपासून राष्टवादी काँग्रेसचे  नेते पक्षसंघटना बांधणीसाठी आठ दिवस मराठवाड्याच्या दोऱ्यावर जाणार  आहेत.      

मुंबई     पक्ष बांधणीवर भर  देण्यासाठी येत्या 10 जूनपासून राष्टवादी काँग्रेसचे  नेते पक्षसंघटना बांधणीसाठी आठ दिवस मराठवाड्याच्या दोऱ्यावर जाणार  आहेत.      

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व  विधीमंडळ पक्षनेतेअजित पवार यांच्या नेतृत्वाखाली .10  जून ते 18 जून पर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या दौरा केला जाणार   आहे.या दौऱ्यात ते संबधित जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी, महिला, युवती , अल्पसंख्याक, सामाजिक न्याय विभाग, ओबीसी सेल व इतर फ्रंटल व सेलच्या पदाधिकाऱ्यांचे  मेळावे घेणार  आहेत.

  त्याच बरोबर जिल्हा प्रभारी, पक्षनिरिक्षक, जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, प्रमुख नेते, जिल्हा संघटनेतील  सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, आजी-माजी स्थानिक स्वराज्य संस्थाचे सर्व पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील सर्व मान्यवर या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

११ जून रोजी दोन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. .१३ जून रोजी हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार ता.औंढा (ना) येथे जयप्रकाश दांडेगावकर यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत.  

१४ जून रोजी परभणी,  १५ जून रोजी नांदेड, १६ जून रोजी लातूर, १७ जून रोजी बीड, १८ जून रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित पवार आणि सुनील तटकरे हे  मार्गदर्शन करणार आहेत.

संबंधित लेख