sunil tatakare attack anat gite | Sarkarnama

अनंत गीते निष्क्रीय मंत्री, सुनील तटकरेंचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पेण : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे आतापर्यंतचे सर्वांत निष्क्रीय मंत्री असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील तटकरे यांनी शनिवारी पेण येथे केली. 

पेण : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे आतापर्यंतचे सर्वांत निष्क्रीय मंत्री असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील तटकरे यांनी शनिवारी पेण येथे केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार सोहळा आणि कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी तटकरे बोलत होते. ते म्हणाले, की गीते यांनी गेल्या निवडणुकीत दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे आश्‍वासन दिले होते; मात्र आजपर्यंत एकाही युवकाला नोकरी दिली नाही. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत एखादा नवीन कारखानाही त्यांना आणता आला नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद व्यर्थ आहे. 

सरकारचे जनतेला फसवण्याचे काम 
तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी 2004 मध्ये भारताला 1550 रुपये प्रतिक्विंटल दर दिला होता; मात्र आजची परिस्थिती काय आहे याचा विचार शेतकरीवर्गाने करावा. मुंबई-गोवा महामार्गाचे कामदेखील अर्धवट आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. तसेच प्रत्येकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्‍वासन दिले. यातून केवळ जनतेला फसवण्याचे काम सरकार करत असल्याचा दावा तटकरे यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख