sunil kedar about BJP | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

सुनील केदार म्हणतात भाजपची "मारबत' काढा 

पांडुरंग भोंगाडे
रविवार, 9 सप्टेंबर 2018

सावनेर (जि. नागपूर) : एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याने जनतेसोबत किती खोटे बोलावे, याला काही मर्यादा आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल- डिझेलचे भाव आकाशाला भिडले आहेत. दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर शंभर रुपयांवर जाणार असून या महागाईच्या विरोधात भाजपची "मारबत' काढण्याची गरज असल्याची टीका सावनेरचे कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केली.
 
विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी "मारबत' काढली जाते. यात एखाद्या वाईट प्रथा किंवा वाईट गोष्टीला समाजातून हद्दपार करा, असे आवाहन करीत युवक रस्त्यावर फिरत असतात. यासाठी "मारबत'ची काल्पनिक प्रतिमा तयार केली जाते. या प्रतिमेला गावात फिरविल्यानंतर जाळण्यात येते. विदर्भात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो
.
यावर्षी मारबतीच्या दिवशीच कॉंग्रेसने पेट्रोल-डिझेलच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. या निमित्ताने कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी सावनेर येथील पोळा मैदानावर उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले. यावेळी आमदार केदार यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपची मारबत काढण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी गावातील अनेक शेतक-यांनी आपल्या बैलजोडया तोरणात सजवून आणल्या होत्या. मा. आमदार सुनील केदार यांच्या हस्ते तोरणात सजवून आणलेल्या बैलजोडी मालक शेतक-यांना दुपट्टा व नारळपान देउन बक्षीस देण्यात आले.

संबंधित लेख