sunil deshmukh 28 may 1958 | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आजचा वाढदिवस - डॉ. सुनील देशमुख

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 मे 2017

अमरावती येथील भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख विद्यार्थी दशेपासून राजकीय चळवळीत उतरले होते. एनएसयूआयच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या विश्‍वासातील युवा नेता म्हणून त्यांची ओळख झाली. ते पहिल्यांदा 1999 मध्ये कॉंग्रेसचे आमदार म्हणून अचलपूर येथून निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये अमरावती मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्रीही होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढविली व कॉंग्रेसचे रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला.

अमरावती येथील भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख विद्यार्थी दशेपासून राजकीय चळवळीत उतरले होते. एनएसयूआयच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या विश्‍वासातील युवा नेता म्हणून त्यांची ओळख झाली. ते पहिल्यांदा 1999 मध्ये कॉंग्रेसचे आमदार म्हणून अचलपूर येथून निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये अमरावती मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्रीही होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढविली व कॉंग्रेसचे रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला. अमरावती शहराचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. शहरात उड्डाण पूल तसेच अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. 

 

संबंधित लेख