त्रिपुरात भाजपचे कमळ फुलवणारे महाराष्ट्रीय सुनील देवधर

दिनेश कांजी या पत्रकाराच्या मदतीने त्यांनी माणिक सरकारविरोधात पुसल्तकही लिहून घेतले. देवधर यांच्या चमुत पुण्यातील तरुणाचा सहभाग मोठा आहे. तसेच देवधर यांनी गावपातळीपर्यंत केलेली बांधणी लक्षात घेऊन मोदी- शहा यांनी देखील त्रिपुरात सभांचा धडाका लावला. मतदानानंतरच्या चाचण्यांपूर्वीच देवधर यांनी त्रिपुराचा लाल रंग भगवा होणार हे स्पष्ट केले होते. हा वैचारिक विजय असल्याची प्रतिक्रया देऊन ते मोकळेही झाले होते.
त्रिपुरात भाजपचे कमळ फुलवणारे महाराष्ट्रीय सुनील देवधर
मुंबई : सुनीलजी, आपसे हमे यहां जीत चाहिए असे सुनील देवधरांना थेट सांगितले होते ते त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. देवधर यांना जबाबदारी दिली होती ती गुजरातमध्ये दमोह जिल्ह्याची. हा जिल्हा कॉंगेसचा बालेकिल्ला म्हणूनच समजला जात होता. 2013 च्या गुजरात च्या त्या विधानसभा निवडणुकीत सुनील देवधरांनी किमया केली आणि तिथे 3-3 अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या जिलह्यात कॉंग्रेसला भाजपने आव्हान तर दिलेच पण दणदणीत विजयही मिळवला. तेच सुनील देवधर आज त्रिुपरातल्या भाजप विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. डाव्यांच्या बालेकिल्यात भाजपचे कमळ फुलवणे हे खरेतर स्वप्नच. पण सुनील देवधर यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. त्रिपुरातला भाजप विजय हा सुनील देवधर आणि त्यांच्या चमुची किमया आहे. देवधर गेली 12 वर्षे ईशान्य भारतात काम करत आहेत. मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेल्या देवधर यांनी आपल्या नियोजबद्ध धोरण आणि संघटनात्मक बांधणीच्या बळावर त्रिपुरा भगवा केला आहे. दमोह जिल्ह्यातल्या कामगिरीनंतर देवधर यांच्यावर वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. तिथे विभागप्रमुख म्हणून काम केल्यावर त्यांना त्रिपुरात पाठवण्यात आले. त्रिपुरात भाजपचे तशा अर्थाने फारसे कामच नव्हते. पण देवधर यांनी संघाच्या पद्धतीने तिथे कामला सुरवात केली त्यांनी मुळापासून काम करून तिथल्या लोकसंख्येत महत्वाचा वाटा अशलेल्या ओबीसी समुहाला एकत्र केले आणि भाजपचे नेटवर्क उभएकेले. परिवारातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या हाकेला ओदेऊन तिथे धाव घेतली. देवधर यांनी या लढाईला वैचारिक संघर्षाचे रुप देऊन त्रिपुरातली माणिक सरकारविरोधात तिथे मोठी जनजागृती केली. दिनेश कांजी या पत्रकाराच्या मदतीने त्यांनी माणिक सरकारविरोधात पुसल्तकही लिहून घेतले. देवधर यांच्या चमुत पुण्यातील तरुणाचा सहभाग मोठा आहे. तसेच देवधर यांनी गावपातळीपर्यंत केलेली बांधणी लक्षात घेऊन मोदी- शहा यांनी देखील त्रिपुरात सभांचा धडाका लावला. मतदानानंतरच्या चाचण्यांपूर्वीच देवधर यांनी त्रिपुराचा लाल रंग भगवा होणार हे स्पष्ट केले होते. हा वैचारिक विजय असल्याची प्रतिक्रया देऊन ते मोकळेही झाले होते. ज्येष्ठ दिवंगत पत्रकार वि. ना. देवधर यांचे चिरंजीव असलेले पक्के मराठी सुनील देवधर आज भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारातले महत्वाचे मोहरे ठरले आहेत हे नक्की. पुण्यातला अद्वैत कुलकर्णी, बारामतीचा सुमंत कोकरे, तसेच श्रावण झा त्याची पत्नी वर्षदा, पराग हा कट्टर संघ स्वंयसेवक आणि शिवानंद नाडकर्णी, अजित माळी हे काही सदस्य सुनील देवधरांच्या टीममधले, तशी देवधरांची टीम बरीच मोठी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com