Sunburn festival shifted from Kesnand | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

वादग्रस्त ठरलेला सनबर्न फेस्टिव्हल यंदा केसनंदमध्ये नाहीच! 

नीलेश कांकरिया
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली हा फेस्टीव्हल म्हणजे धांगडधिंगा असल्याचा आरोप झाला होता. मात्र सर्व विरोध झुगारुन पोलीस बंदोबस्तात हा तो अखेर पार पडला. फेस्टिव्हल दरम्यान चार दिवस पुणे- नगर महामार्गावर वाघोलीत प्रचंड वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागले होते.

वाघोली : केसनंद ( ता. हवेली ) येथे गेल्या वर्षी झालेला सनबर्न फेस्टीव्हल यंदा पिंपरी- चिंचवडला हलविण्यात आला आहे. 28 ते 31 डिसेंबर दरम्यान हा फेस्टीव्हल होणार आहे. केसनंद येथे झालेला प्रखर विरोध, फेस्टिव्हलनंतर मुख्य मंचाला लागलेली आग, वनखात्याच्या जागेत खोदकाम केल्याने दाखल झालेले गुन्हे यामुळेच तो येथून हलविण्यात आल्याची चर्चा आहे. 

डिसेंबर 2016 मध्ये केसनंद (ता. हवेली) येथील डोंगरावर या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्याची तयारी सुरू झाल्यापासुन हिंदू व स्थानिक संघटना, परीसरातील नागरीकांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली होती. जिल्ह्यात सर्वत्र डीजे वाजविण्यास बंदी असताना या फेस्टिव्हलला परवानगी दिल्याने पोलिसांवरही टीका झाली होती. या विरोधात स्थानिकांनी आंदोलनही केले होते. 

नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली हा फेस्टीव्हल म्हणजे धांगडधिंगा असल्याचा आरोप झाला होता. मात्र सर्व विरोध झुगारुन पोलीस बंदोबस्तात हा तो अखेर पार पडला. फेस्टिव्हल दरम्यान चार दिवस पुणे- नगर महामार्गावर वाघोलीत प्रचंड वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागले. तेथे लावलेल्या डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्याची तक्रारही काही स्थानिकेंनी पोलिसांकडे केली होती. तसेच वनखात्याच्या जमिनीचा बेकायदा वापर करुन रस्ता केल्याची तक्रारही दाखल झाली होती. बेकायदा उत्खनन व अन्य प्रकाराबाबत फेस्टिव्हलचे आयोजन करणार्या कंपनीला 60 लाख रुपयांचा दंडही करण्यात आला होता.

याबाबत विधानसभेत आमदार भीमराव तापकीर व सुनील प्रभू यानी तारांकित प्रश्नही विचारला होता. या प्रखर विरोधानंतर फेस्टीव्हल पार पडला. मात्र तो संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्य मंच काढण्याचे काम सुरु असताना त्याला आग लागली. यामध्ये तो जळून खाक झाला. या सर्व घटनांमुळे यंदा हा तो केसनंद येथुन पिंपरी चिंचवडला हलविण्यात आल्याची चर्चा आहे. पिंपरी- चिंचवड मधील नेमके ठिकाण कोणते याबाबत ऑनलाइनवर माहीती देण्यात आलेली नाही. 

यंदाच्या फेस्टिव्हलची ऑनलाईन तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये हा फेस्टीव्हल पिंपरी चिंचवड येथे होणार असल्याची माहीती आहे. 5,120 रुपायापासुन पुढे या चार दिवसांच्या तिकिटांची किंमत आहे. 
 

संबंधित लेख