summons to kejriwal and mla | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

केजरीवालांसह आमदारांना समन्स 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : राज्याचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अकरा आमदारांना समन्स बजावले आहेत.

केजरीवाल यांच्या निवासस्थानी 19 फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या बैठकीत प्रकाश यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 13 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेत अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी समर विशाल यांनी केजरीवालांसह अन्य नेत्यांना समन्स बजावले आहेत.

पोलिसांच्या या आरोपपत्रामध्ये "आप'चे आमदार अमानातुल्ला खान, प्रकाश जारवाल, नितीन त्यागी, रितूराज गोविंद, संजीव झा, अजय दत्त, राजेश रिशी, राजेश गुप्ता, मदन लाल, परवीनकुमार आणि दिनेश मोहनिया यांचा समावेश आहे. 

संबंधित लेख