sule and prakash raj | Sarkarnama

सुप्रिया सुळे, कन्हैयाकुमार, प्रकाश राज नागपूरमध्ये रविवारी एकाच व्यासपीठावर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर : बहुजन विचारमंचतर्फे येत्या 23 डिसेंबरला आयोजित केलेल्या संविधान जागरच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार व प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज नागपुरात येणार आहेत. बहुजन विचारमंचतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात असला तरी या आयोजनामागे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याचे बोलले जात आहे. माजी मंत्री व अ. भा. कॉंग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात संविधानावर तसेच संविधानानुसार अस्तित्वात असलेल्या संस्थांना खिळखिळे करणे सुरू आहे. याचा विरोध करण्यासाठी संविधान जागर असल्याचे बोलले जात आहे. यासाठी विदर्भातून 10 हजारावर लोकांची गर्दी जमविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. नागपुरातील मानकापूर स्पोर्टस स्टेडीयममध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 

आपल्या देशाचा मानबिंदू असलेल्या संविधानात बदल घडवून आणण्याची भाषा आजकाल अनेकप्रसंगी केल्या जात आहे. जातीधर्माचे राजकारण करणाऱ्या अशा वाईट प्रवृत्ती फोफावत चाललेल्या आहेत. अशा परिस्थिती बहुजनांचे भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी भारतीय नागरीक असणाऱ्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीने संविधानाची शक्ती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी संविधान जागर असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्याकडे दिले आहे. स्थानिक किंवा राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना या कार्यक्रमात मात्र सामील करून घेतले नाही, हे विशेष. 

संबंधित लेख