sujay vikhe patil may join another party | Sarkarnama

आईवडील काॅंग्रेसमध्ये असले तरी सुजय विखे दुसऱ्या पक्षात जाणार!

गोविंद साळुंखे
बुधवार, 26 डिसेंबर 2018

शिर्डी : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आज खासदारकी मिळविण्यासाठी काॅंग्रेस पक्षाचा त्याग करण्याचा निर्धार व्यक्त केला. काॅंग्रेस सोडून ते भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आईवडील काॅंग्रेसमध्ये आहेत म्हणून मी काॅंग्रेसमध्येच राहिले पाहिजे असे नाही, असा दावा करत आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्याने आपण दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो, असे त्यांनी आज शिर्डी येथे सांगितले. त्यांचा दुसरा पक्ष म्हणजे भाजपच असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्यासाठी डाॅ. सुजय हे आधीपासून तयारी करत आहेत. हा मतदारसंघ आघाडीच्या वाटपात राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आहे. तो काॅंग्रेसकडे यावा यासाठी विखे यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र ते शक्य झाल्याचे डाॅ. सुजय यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. ते राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच ते भाजपचा मार्ग धरण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ते भाजपमध्ये आले तर विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

संबंधित लेख